crime sakal
पुणे

पुणे : गुटखा विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्यांना अटक

कथित पत्रकारासह सहा जणांचा समावेश, लोणी काळभोर पोलिसांकडून साडे अकरा लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन : गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्यास कथित पत्रकार असल्याचे भासवून अडीच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खंडणीची रक्कम, गुटखा व वाहन असे एकूण साडे अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी देवाची येथील बाजारेमळा येथे ही कारवाई केली.

प्रवीण बाजीराव झेंडे (वय 27, रा.जिजामाता चौक, आंबेगाव पठार), विनोद अंबादास साळुंके (वय 45, रा.कात्रज), प्रमोद भानुदास घोणे (वय 26, रा. धनकवडी), सोमनाथ यशवंत भडावळे (वय 33, रा.धनकवडी), बबन अंबादास साळुंके (वय 44), परमेश्‍वर अभिमान यमगर (वय 35, , रा.फालेनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना रक्कम देणाऱ्या अबु सहामा शेख (वय 36, रा. मार्केट यार्ड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या गोडाऊनमधील गुटखा जप्त करण्यात आला.

उरुळी देवाची येथील बाजारमेळा येथील अबु शेख याने अवैध गुटखा साठा केला असून त्याच्याकडे कथित पत्रकार प्रवीण झेंडे याने 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी घेण्यासाठी ते बाजारेमळा येथे येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रक्कम जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT