police sakal
पुणे

Pune : अवैध रिक्षाथांबा हटविला, विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाला पत्र- साळुंखे

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक बालगुडे

उंड्री : कडनगर चौकामध्ये वाहतूक सुरळीत राहावी, वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणारा अवैध रिक्षा थांबा हलविला असून, विद्युत खांब हलविण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे, असे हांडेवाडी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांनी सांगितले.

कडनगर चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसाठी बेंच (बाक) बसविण्यात आला. याप्रसंगी पोलीस हवालदार संदीपकुमार गोवेकर, महेश कांबळे, युवराज जाधव आणि स्थानिक विश्वास कड, संतोष कड, रोहित पाटील, सचिन साठे, मयूर कड, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

साळुंखे म्हणाले की, उंड्रीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठी आहे, तसेच पाण्याच्या टँकरची वर्दळ सतत असते. नोकरी व्यवसायानिमित्त शहर-उपनगराकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असून, शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी चौकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विश्वास कड म्हणाले की, स्कूल बस आणि पाण्याच्या टँकरची संख्या मोठी असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतूककोंडी होते. पालिका प्रशासनाने रस्तारुंदीकरण करून सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

FDA Crime : पळा पळा अधिकारी आले...; दुकाने बंद करून अनेक व्यापारी गेले पळुन

Khadakwasala Bridge : खडकवासला पुलाचे आयुष्य वाढले; जड वाहतूक लवकरच होणार सुरू

SCROLL FOR NEXT