Pune IMD Scientist 
पुणे

अंटार्क्टिकातील प्रदूषणाचा होणार अभ्यास

पुणे आयएमडीचे शास्त्रज्ञ घेणार अंटार्क्टिक मोहिमेत सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमांतर्गत यंदाच्या अंटार्क्टिक मोहिमेत पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील (आयएमडी) तीन शास्त्रज्ञांचा समावेश असणार आहे. महत्त्वाचे म्हणजेच प्रथमच आयएमडीद्वारे अंटार्क्टिक येथील प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ही मोहीम अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. तसेच मराठमोळ्या शास्त्रज्ञांचा या मोहिमेतील सहभाग ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

आयएमडीचे शास्त्रज्ञ अशोक खुटवड, अजित कोंडे आणि अरुण साबळे या तिघांची निवड अंटार्क्टिक मोहिमेसाठी झाली आहे. यामध्ये आयएमडीसह इतर संस्थांचे शास्त्रज्ञ मिळून एकूण २५ शास्त्रज्ञांचा गट मोहिमेत भाग घेणार आहे.

बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या अंटार्टिका खंडात अनेक रहस्य दडलेले आहेत. जागतिक पातळीवर विविध संस्थांच्या वतीने येथील हवामानाचा अभ्यास केला जात आहे. यंदा या मोहिमेत सहभागी झालेल्या खुटवड यांची ही तिसरी मोहीम असून या पूर्वी त्यांनी अंटार्क्टिका येथील ‘मैत्री’ या संशोधन केंद्रावर काम केले. मात्र यंदा खुटवड आणि कोंडे हे भारती केंद्रावर, तर साबळे हे मैत्री केंद्रावर काम करणार आहेत.

प्रदूषणाचा अभ्यास

अंटार्क्टिका येथे बर्फवृष्टी होते. तिथे पाऊस पडत नाही, त्यामुळे प्रदूषणाचा हवा आणि पाण्यावरील परिणाम पाहण्यात येणार आहे. प्रदूषणाची स्थिती नेमकी कशी आहे, हे समजण्यासाठी तेथील बर्फ, तलाव आणि समुद्रातील पाण्याचे नमुने या मोहिमेदरम्यान संकलित केले जाणार. तसेच या नमुन्यांचा अभ्यास पुण्यात आयएमडीच्या प्रयोगशाळेत होणार आहे.

मोहिमेपूर्व प्रशिक्षण

अंटार्क्टिक येथील वातावरणाशी जुळवून घेणे, माउंटेनिअरिंग, अभ्यासासाठी तयारी, आपत्तीच्या काळात संरक्षण कसे करावे अशा विविध गोष्टींचे पूर्ण प्रशिक्षण या शास्त्रज्ञांना दिले आहे. यासाठी सुमारे दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिले गेले.

असा असेल प्रवास

  • रविवारी (ता. ६) पुण्यातून गोव्याला तिघे रवाना. गोव्यात एक आठवड्यासाठी प्रशिक्षण

  • केपटाऊनमध्ये १० दिवसांचा विलगीकरण कालावधी

  • मैत्री केंद्रावरून विमानाद्वारे सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत भारती केंद्रावर पोचणार

  • २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत नेमलेल्या केंद्रावर पोचण्याची शक्यता

  • याचा अभ्यास होणार

  • वाऱ्याची दिशा, वेग, ढगांचे निरिक्षण, तापमान, अद्रता अशा १६ घटकांची दर तीन तासांनी नोंदी

  • डेटाचा वापर हवामान मॉडेलमध्ये करून हवामानाचा अंदाज काढणे

  • ओझोनच्या थराचे प्रमाण तपासणे

  • जागतिक तापमान वाढीचा अभ्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT