Khadakwasala Dam
Khadakwasala Dam Sakal
पुणे

पुणे: पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गतवर्षी ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश तर, खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे पूर्ण भरली होती. परंतु यंदाच्या ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सर्व धरणांतील पाणीसाठ्यात तुलनेत घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आज मंगळवारअखेर २७.४२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो सुमारे ९४ टक्के इतका आहे.

भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, वरसगाव आणि नीरा देवधर या चार धरणांमध्येच सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे. यंदा पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण भरली होती. परंतु ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे वरसगाव वगळता इतर तीन धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा ९८ टक्के आणि खडकवासला धरणातील पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला आहे. सध्या खडकवासला धरणातून उजवा मुठा कालव्याद्वारे एक हजार १५५ क्युसेकने आवर्तन सुरू आहे.

‘उजनी’त ३२ टीएमसी पाणीसाठा

सध्या उजनी धरणात ३२.७० टीएमसी म्हणजे (६१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रमुख धरणांतील आजअखेर उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

टेमघर ३.३४ (९०.२१)

वरसगाव १२.८२ (१००)

पानशेत १०.४९ (९८.५३)

खडकवासला ०.७५ (३८.२२)

पवना ८.३३ (९७.८७)

माणिकडोह ४.७१ (४६.३३)

येडगाव ०.६१ (३१.१८)

वडज ०.८० (६८)

डिंभे ११.०८ (८८.७०)

घोड १.०८ (२२.१८)विसापूर ०.०९ (९.९२)

कळमोडी १.५१ (१००)

चासकमान ७.४३ (९८.१३)

भामा आसखेड ६.९१ (९०.१८)

वडिवळे ०.८९ (८२.९९)

आंद्रा २.९२ (१००)

कासारसाई ०.५५ (९७.४५)

गुंजवणी ३.३० (८९.४६)

नीरा देवघर ११.७३ (१००)भाटघर २१.७० (९२.३५)

वीर ७.३१ (७७.७०)

नाझरे ०.१५ (२५.७२)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT