Pune Indapur city development works Inauguration 
पुणे

पुणे : इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - दत्तात्रय भरणे

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये १८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

डॉ. संदेश शहा

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असलेल्या तसेच अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये १८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, सत्तेचा ताम्रपट घेवून कोणीही आले नाही मात्र मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी केल्यास संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जनसेवक म्हणून महविकास आघाडीच्या माध्यमा तून काम करत आहे. त्यामुळे शहर वैभवात भर घालणाऱ्या प्रशासकीय भवन, न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या भव्य इमारती उभ्या करता आल्या. सार्वजनिक रस्ते तसेच चौक सुशोभीकरण करता आले. शहराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रदीप गारटकर म्हणाले, कार्यक्षम मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यात कामांचा आदर्श उभा केला आहे. हे काम करत असताना त्यांनी शहर व तालुक्यात रस्ते, वीज, पाणी व पर्यटनासंदर्भात लक्षवेधी काम केले. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. यावेळी हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, सचिन सपकळ, बाळासाहेब ढवळे, शुभम निंबाळकर, उमा इंगूले, इम्रान शेख, वसीम बागवान, विठ्ठल ननवरे, दिलीप वाघमारे, अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, वसंत मालुंजकर, अनिल राऊत, प्रशांत सिताप, अण्णा ढावरे, महादेव शिंदे, निखिल बाब्रस, सुधीर मखरे, राजेश शिंदे, हरिदास हराळे, महादेव लोखंडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT