Indapur Prohibition
Indapur Prohibition sakal
पुणे

पुणे : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे, सहकारी आमदारांचा जाहिर निषेध

डॉ. संदेश शहा

इंदापूर : शिवसेनेचे बंडखोर नगररचना मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या विरोधात शिवसैनिक इंदापूरात रस्त्यावर उतरून त्यांनी त्यांचा जाहिर निषेध केला तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच सोबत इंदापूर येथील शिवसेना ठाम असल्याचा यावेळी जाहिर निर्वाळा देण्यात आला .यावेळी एकनाथ शिंदे गद्दार है अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुका जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेची विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक भीमराव भोसले,उपजिल्हाप्रमुख संजय काळे,तालुकाप्रमुख नितीन शिंदे,शहरप्रमुख महादेव सोमवंशी,तालुका संघटक सुदर्शन रणवरे,तालुका समन्वयक अरुण पवार, उपजिल्हा संघटिकाbपुष्पा घोरपडे,तालुका संघटिका सुरेखा लोहार यांची भाषणे झाली. त्यानंतर सर्वजण इंदापूर नगरपरिषद प्रांगणात जमले. यावेळी एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी सचिन इंगळे, अविनाश खंडाळे, आप्पा डोंगरे,मंदार डोंबाळे, धोंडीराम सोनटक्के,रामचंद्र पाचंगणे, अशोक देवकर, योगेश वाघमोडे, बंडू शेवाळे, गोरख कदम, अवधूत पाटील, सुरज काळे, संजय खंडाळे, प्रवीण देवकर,सचिन चौगुले, शकील बेपारी, बालाजी पाटील,हनुमंत कांबळे, अंकुश गलांडे, हेमंत भोसले, योगेश कणसे, श्याम लावंड, दिलीप माने, लक्ष्मण साळुंके, श्रीमंत कुंभार, देवा मगर, युवराज लोंढे, पांडुरंग सोनवणे, महादेव सकुंडे, बाळासो घाडगे,आदेश पवार, मोहन आरडे, जहाँगीर पठाण, सविता अनारसे, ज्योती गाढवे, ज्योती शिंदे, निर्मल चिंचोके, काजल वाल्मिकी, आरती मंडाले, संतोष क्षीरसागर, सुरेश बनकर, योगेश हरिहर, अनिल परदेशी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT