chakan
chakan sakal
पुणे

Vijay Mittal : भारत वाहन उत्पादनाचे केंद्र बनेल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘स्थानिक स्तरावरील ग्राहकांची मोठी संख्या, स्वदेशी इंजिनिअरिंग क्षमता व सरकारच्या अनुकूल धोरणांच्या जोरावर भारत ‘वर्ल्ड क्लास ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग बेस’ म्हणून पुढे येऊ शकतो,’ असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव विजय मित्तल यांनी येथे व्यक्त केले.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने आणि एसएई इंडिया व एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्यातर्फे चाकणमधील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर (एआरएआय-एचटीसी) येथे सुरू असलेल्या ‘ऑटोमोटिव्ह मटेरिअल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ (एएम अँड एम २०२३) या विषयावर आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पाहवा मेटलटेक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार पाहवा, अशोक लेलँडचे मुख्य तांत्रिक अधिकारी व ‘एआरएआय’चे उपाध्यक्ष डॉ. एन. सरवानन, ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई आणि ‘एआरएआय’च्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या समन्वयक मेधा जांभळे आदी उपस्थित होते.

परिषदेत ४४ शोधनिबंध सादर झाले. त्यातील मटेरिअल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, कॅरेक्टराईझेशन व ॲनॅलिसिस, मॉडेलिंग व सिम्युलेशन या विभागांत सर्वोत्तम संशोधनात्मक पेपर सादर करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी मित्तल म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत भारतीय वाहन उद्योग क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख ऑटोबाजार म्हणून पुढे आले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात देशात रोजगारातही मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत.’ स्थानिक उत्पादनांमध्ये वाढ, ई-मोबिलिटीला प्रोत्साहन यासाठी सरकारी योजनांद्वारे प्रयत्न केले जात असल्याची माहितीदेखील या वेळी त्यांनी दिली.

आतापर्यंत वाहन तंत्रज्ञानासाठी पाश्चिमात्य देशांकडे पाहिले जायचे. मात्र, आता इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग व गुणवत्ता याबाबत भारत पुढे येत असून, भविष्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश सर्वांत आघाडीवर असेल, असे प्रतिपादन पाहवा यांनी केले. ‘२०३० पर्यंत वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनात मोठा बदल पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे लोकांचा कल वाढला असून, हायड्रोजनवर आधारित आयसीई इंजिन, मिथेनॉल, इथेनॉलचा वापरदेखील भविष्यात केला जाईल,’ असे डॉ. एन. सरवानन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT