Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

Pune : ३४० महाविद्यालयांमध्ये ‘इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस’ स्पर्धेला सुरुवात

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप विषयक कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी याद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘इन्फोफेस्ट २०२२’मधील ‘इनोव्हेशन टू एंटरप्रायझेस’ या नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेला सुरवात झाली आहे. या स्पर्धेत पुणे, नगर व नाशिक येथील विद्यापीठाशी संलग्न ३४० महाविद्यालयांतील प्रतिनिधींचा समावेश यात आहे.

विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाकडून दरवर्षी ‘इनोफेस्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप विषयक कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी याद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘स्टार्टअप इनोव्हेशन सेल’ स्थापन करण्यात आली आहे. यावर्षी १०० महाविद्यालये यामध्ये नव्याने जोडली गेली आहेत. विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या,‘‘इनोव्हेशन टू एंटरप्रायझेस’ स्पर्धेत ३४० महाविद्यालयातून प्रत्येकी २ गट असतील. प्रत्येक गटामध्ये साधारणत: तीन ते चार विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.

या सर्व विद्यार्थ्यांची महाविद्यालय स्तरावर पहिली फेरी होईल. त्यानंतर त्यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची ‘क्लस्टर लेव्हल’ स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून ‘टॉप १०० टीम’ची निवड केली जाईल. निवडण्यात आलेल्या या टीमसाठी तीन दिवसीय ‘बूट कॅम्प’चे होणार असून त्यांना संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. त्यातून २५ ते ३० गटांचे स्टार्टअप निवडून त्यांच्यामध्ये विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा होईल. त्यातून निवड झालेल्या दोन स्टार्टअप गटांना रोख पारितोषिके तर उर्वरित गटांना ‘प्री-इनक्युबेशन प्रशिक्षण’ देण्यात येईल. यातील ४० चांगल्या स्टार्टअपस्‌ना मार्गदर्शन तर काहींना विद्यापीठाच्या नवोपक्रम केंद्रात काम करण्याची संधी मिळेल. तसेच स्टार्टअपला व्यवसायात रूपांतर होईपर्यंत पाठिंबा दिला जाईल.’’ यंदा ही स्पर्धा ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT