Khed Pune Inter Caste Marriage Prajakta Gosavi and Vishwanath Gosavi case esakal
पुणे

Pune Crime News : सैराट नाही हे तर…खेड आंतरजातीय विवाह प्रकरणाला वेगळं वळण, विश्वनाथची पहिली बायको, 40 हून अधिक गाड्या अन्......

Khed Pune Inter Caste Marriage case : खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराटसदृश आंतरजातीय विवाह प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. प्राजक्ता गोसावीच्या अपहरणानंतर विश्वनाथ गोसावीवर अंधश्रद्धा आणि पूर्वविवाहाचे गंभीर आरोप झाले आहेत.

Saisimran Ghashi

  • खरपुडीतील आंतरजातीय विवाह प्रकरणात प्राजक्ता गोसावीच्या अपहरणाने सैराटसदृश घटना घडली.

  • विश्वनाथ गोसावीवर अंधश्रद्धा आणि पूर्वविवाह लपवल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

  • खेड पोलिसांनी तपास तीव्र करत आरोपींना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Pune Khed Intercaste Marriage News : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं. कारण होतं विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटनापण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला. पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता.

त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सैराटसारखी घटना खऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं. ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला.

संध्याकाळपर्यंत प्राजक्ताचे वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आले. प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत, "माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये," असं सांगितलं. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.

विश्वनाथ याचं आधीचं लग्न झालं आहे, आणि त्यांनी हे लपवलं. तसंच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे, हे सत्य बाहेर यावं. या आश्रमात ४० हून अधिक गाड्या, आलिशान खोल्या, आणि मोठी शेती असल्याची माहितीही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

या प्रकरणात सैराटसारखा काही प्रकार नाही. या प्रकरणात एक वेगळा कट रचला जातोय. पोलिसांनी घटनास्थळी दांडके शोधले नाहीत आणि मुलीचा जबाब समोर यायला हवा तर खरपुडीतील सैराटसदृश प्रकरण आता अनेक वळणं घेत आहे...मुलीच्या जबाबावर, आरोपींच्या चौकशीवर, आणि पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण अवलंबून राहिलं आहे. ही सर्व माहिती अमोल मांडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी, निलेश आंधळे (वकील), राजाराम काशीद (प्राजक्ताचे वडील) यांनी दिली आहे

FAQs

  1. What is the Kharapudi Sairat case about?
    खरपुडी सैराट प्रकरण काय आहे?

    खरपुडीतील विश्वनाथ आणि प्राजक्ता गोसावी यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबाचा विरोध होता, ज्यामुळे अपहरण आणि मारहाणीची घटना घडली.

  2. Why was Prajakta Gosavi abducted?
    प्राजक्ता गोसावीचे अपहरण का झाले?

    प्राजक्ताच्या कुटुंबाला तिच्या आंतरजातीय विवाहाला विरोध होता, त्यामुळे तिच्या आई, वडील आणि भावाने तिला जबरदस्तीने घेऊन गेले.

  3. What are the allegations against Vishwanath Gosavi?
    विश्वनाथ गोसावीवर कोणते आरोप आहेत?

    विश्वनाथवर पूर्वीचे लग्न लपवणे आणि त्याच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप काशीद कुटुंबाने केला आहे.

  4. What actions have the police taken in this case?
    या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

  5. What role does the viral video play in this case?
    व्हायरल व्हिडिओची या प्रकरणात काय भूमिका आहे?

    व्हायरल व्हिडिओमुळे प्राजक्ताच्या अपहरणाची आणि मारहाणीची घटना समोर आली, ज्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT