dr jabbar patel sakal
पुणे

PIFF Mahotsav : २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान - डॉ. जब्बार पटेल

२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

समाधान काटे

शिवाजीनगर - २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्याची आणि महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यावर्षी ५१ देशांमधून आलेले १४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी मान्यवर व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

pune international film festival

यावेळच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र ‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) हे असल्याचे आणि त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या चित्राची यावेळी माहिती देण्यात आली. या महोत्सवातील चित्रपट यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर दाखविले जाणार आहेत.

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक २ स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवार (ता. २३) डिसेंबरपासून www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असून, चित्रपटगृहांवर जागेवर नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावर्षी ६८ देशांतून ११८६ चित्रपट महोत्सवासाठी दाखल झाल्याचे आणि त्यांपैकी १४० हून अधिक चित्रपटांची महोत्सवासाठी निवड झाल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागातील १४ चित्रपट अ सेन्सेटीव्ह पर्सन, ब्लागाज लेसन्स, सिटीझन सेंट, फ्लाय ऑन, हिअर, ओशन आर द रिअल कॉन्टिनेंटस्, पुआन, शल्मासेल, टेरिस्टेरीयल व्हर्सेस, द बर्डन्ड, द ड्रीमर, द सेन्टेन्स, टोल, टुमारो इज अ लॉंग टाईम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

SCROLL FOR NEXT