Pune International Literary Festival 
पुणे

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल २१ ते २३ डिसेंबर दरम्यान

फेस्टिव्हलचे हे नववे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षी तो ऑनलाईन होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील पहिला इंग्रजी साहित्याचा महोत्सव असलेला ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’ (PILF) २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ऑनलाईन (Online) होणार आहे. फेस्टिव्हलचे हे नववे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षी तो ऑनलाईन होणार आहे.

विश्वकर्मा पब्लिकेशनच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भारतासह आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, यूके, यूएसए अशा देशांमधील १५० वक्ते, ७० हून अधिक सत्रे तीन वेगवेगळ्या ऑनलाइन स्टुडिओमध्ये फेस्टिव्हल दरम्यान होणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि संचालक डॉ. मंजिरी प्रभू यांनी दिली. शब्द सर्व प्रकारात साजरे करणे हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे. लेखक आणि वाचक यांच्यात थेट संपर्क आणि प्रेरणादायी व्यासपीठ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सेसेलिया अहेर्न, अलेक्झांड्रा प्रिंगल, कार्ल ए हार्टे, डॉ. मार्क अल्ड्रिज, हेलन स्मिथ, लिझ न्युजेंट, मारिया फ्रेडरिक, जेम्स झिस्किन, सॅम ब्लेक, स्टेफानो पेले, सुजाता मॅसी, विकी सॅटलो, एलिझाबेथ क्रॅच, जेनेट रुडॉल्फ यांच्यासह लेखक आणि खासदार डॉ. शशी थरूर, दिग्दर्शक मीरा नायर, लेखिका नयनतारा सहगल, स्तंभ लेखिका शोभा डे, गायक रेमो फर्नांडिस, लेखक गुरू ठाकूर, भरत दाभोलकर, अश्विन संघी, डॉ. मंजिरी प्रभू, राज नायक, अंबिका अय्यादुराई, अनाहिता धोंडी, अनिर्बन भट्टाचार्य, अँटोइन लुईस, सुहेल माथूर, अंजली भूषण, अर्पण रॉय आदी वक्ते फेस्टिव्हलला लाभले आहे. तर डॉ. जेन गुडॉल, डॉ. शशी थरूर, आना आगा, अनिता मुरजानी, इंन्फोसिसचे नारायण मूर्ति, गणेश नटराजन हे देखील फेस्टिव्हलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. फेस्टिव्हलच्या अधिक माहितीसाठी www.pilf.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT