PIFF Mahotsav Sakal
पुणे

PIFF Mahotsav : पुण्यात २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार ‘पिफ’

चित्रपट क्षेत्राचा मानबिंदू असणारा २१ वा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

चित्रपट क्षेत्राचा मानबिंदू असणारा २१ वा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.

पुणे - चित्रपट क्षेत्राचा मानबिंदू असणारा २१ वा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात यंदा जगभरातील १४० दर्जेदार चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मंग‌ळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते उपस्थित होते. महोत्सवासाठी निवड झालेल्या जागतिक स्पर्धा विभागातील चौदा चित्रपटांची घोषणाही यावेळी करण्यात आली. ‘पिफ’ हा महाराष्ट्र सरकारचा अधिकृत महोत्सव असल्याने आम्ही त्यासाठी आर्थिक मदतीसह इतरही सर्व प्रकारची मदत करू, असे आश्वासन डॉ. ढाकणे यांनी दिले.

महोत्सवासाठी यंदा ७२ देशांमधून १ हजार ५७४ चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत. पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन येथील सहा स्क्रीन्स, कॅम्प परिसरातील आयनॉक्समधील दोन स्क्रीन्स आणि राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथील एक स्क्रीन, या तीन स्थळी महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावर्षी महोत्सव केवळ चित्रपटगृहात होणार असून महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून (ता. ५) www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

‘जी२०’मुळे महोत्सव पुढे ढकलला

यापूर्वी १२ ते १९ जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे नियोजन केले होते. मात्र याच काळात पुण्यात ‘जी२०’ परिषद होत आहे. ‘पिफ’मधील बहुतांश चित्रपटांचे प्रदर्शन पॅव्हेलियन मॉलमध्ये होणार असल्याने वाहतुकीचा ताण वाढू नये, म्हणून प्रशासनाने महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. या विनंतीचा स्वीकार करून महोत्सव पुढे ढकलला. तसेच, महोत्सवासाठी सरकारने चार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचे आश्वासन दिले असून त्यापैकी काही रक्कम मिळाली आहे. उर्वरित निधीही लवकरच मिळेल, असे डॉ. जब्बार पटेल यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT