NIA officials during a raid linked to the Pune ISIS sleeper cell case, resulting in the 11th arrest in the ongoing investigation.  sakal
पुणे

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

NIA’s 11th Arrest in Pune ISIS Module Case: मोठा घातपात घडवण्यासाठी करत होता तयारी; अनेक संवेदनशील अन् महत्वपूर्ण ठिकाणांची केली होती रेकी!

Mayur Ratnaparkhe

Pune terror module under investigation: पुणे इसीस स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी आज(शुक्रवार) अकरावी अटक झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एका तरुणाला अटक केली आहे. रिझवान अली असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे या आरोपी रिझवानवर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

आरोपी रिझवान आयसीस या दहशतवादी संघटनेशी जोडलेला असून अनेक दहशतवादी कृत्याच्या कटांत सहभागी होता. अटक आरोपीविरोधात अजामीनपत्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. इराक आणि सीरियासारख्या इस्लामिक राष्ट्रांप्रमाणे भारतातही अंतर्गत करावया घडवून आणायच्या आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात रिझवानचा सहभाग होता.

रिझवानने अनेक संवेदनशील आणि महत्वपूर्ण ठिकाणांची दहशतवादी लपण्यासाठी रेकी केल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलेलं आहे. तर देशात दहशतवादी कारवाया घडवून तणाव वाढवण्याच्या प्रयत्नात रिझवान होता, अशी माहिती समोर आली आहे.

या आधी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील इसिस स्लीपर मॉड्यूलप्रकरणी (ISIS Sleeper Module) दोन फरार आरोपींना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) अटक केली होती. अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तलग खान अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथे लपून बसले होते आणि भारतात परतण्याच्या प्रयत्नात होते.

या प्रकरणाचा संबंध २०२३ मधील पुण्यात आयईडी (विस्फोटक उपकरण) तयार करून त्याची चाचणी करण्याच्या कटाशी आहे. आरोपींनी पुण्यातील कोंढवा भागातील एका भाड्याच्या घरातून बॉम्ब तयार करण्याचे काम केले. त्यांनी तिथे बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले होते आणि स्वतः तयार केलेल्या आयईडीचा नियंत्रणात स्फोट करून प्रयोग केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT