pune jambhulwadi dari bridge accident  
पुणे

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी-दरी पुलावर भीषण अपघात; कंटेनरची ४ ते ५ वाहनांना धडक, दोघे ठार

रोहित कणसे

पुणे शहरातील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूलावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास साताऱ्याच्या बाजूने येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिली. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT