पुणे

नामांकित सराफी पेढीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

CD

शिरूर, ता. १७ : सोन्याची मोड देतो, असे सांगून त्याबदल्यात एक कोटी रुपये घेऊन प्रत्यक्षात मोड किंवा घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका नामांकित सराफी पेढीतील कर्मचाऱ्याविरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत ओमकार अष्टेकर (रा. कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत कांतिलाल बर्मेचा (रा. शांतीनगर, पुणे) याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टेकर यांचे येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता परिसरातील एका नामांकित ज्वेलर्स यांच्याशीही त्यांचा व्यवहार होता. ते सोन्याच्या मोडीच्या लगडी त्यांच्याकडून खरेदी करीत. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचे अष्टेकर यांच्यासमवेतचे सर्व व्यवहार बर्मेचा पाहत.
दरम्यान, सोन्याची मोड देतो, असे सांगून बर्मेचा याने अष्टेकर यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. बर्मेचा याच्या सांगण्यावरून ३१ जानेवारीला ही रक्कम घेण्यासाठी कविता रमाकांत पराळे आणि त्यांची मुलगी मधु रमाकांत पराळे (रा. केडगाव, अहिल्यानगर) या शिरूरला आल्या. अष्टेकर यांच्या दुकानातील व्यवस्थापक प्रतीक टाक यांनी त्यांना एक कोटी रुपये दिले. बर्मेचा याच्यामार्फत केलेल्या या व्यवहारापोटी कागदपत्रावर मधु पराळे यांनी खोटे नाव टाकून बनावट सही केली.
यानंतर अष्टेकर यांनी बर्मेचा याच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी १५ लाख ३५ हजार रुपये परत केले. मात्र, अनेकदा मागणी करूनही बर्मेचा याच्याकडून ८४ लाख ६५ हजार रुपये अद्याप परत मिळाले नाहीत. याबाबत अष्टेकर यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बर्मेचा याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT