पुणे

दहा तरुणांची एक कोटींची फसवणूक

CD

पुणे, ता. २४ ः पुणे महापालिकेत विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा सुशिक्षित तरुणांची एक कोटी पाच लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार शिवानंद पाटील यांच्याकडे महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे तोडलेल्या अवस्थेतील अकरा बनावट रबरी शिक्के सापडले असून, जप्त लॅपटॉपमध्ये साठहून अधिक संशयास्पद फाइल्स आढळले आहेत.
याप्रकरणी शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४३, रा. कर्वेनगर) याच्यासह अमित गजानन दारवटकर (वय ४४), अमित सुहास देशपांडे (वय ४६, दोघे रा. शुक्रवार पेठ), आनंद गणपती लोंढेणवार (वय २९, रा. वारजे माळवाडी), राजेंद्र बबन खेडेकर (वय ५२, रा. एरंडवणे) व अन्य आरोपींविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका सुरक्षारक्षकाने तक्रार दिली.
आरोपींनी तक्रारदारांसह अन्य नऊ उमेदवारांना लिपिक, अभियंता, आरोग्य निरीक्षक अशा विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले. या उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, पालिकेचे खोटे ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांची कागदपत्रे दिली; तसेच, पुणे महापालिकेच्या नावाने मोबाइलवर मेसेज पाठवून पगार जमा झाल्याचे भासविले, असे तपासात निष्पन्न झाले.

कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शिवानंद पाटील याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. लॅपटॉपमधील डेटा रिकव्हर करणे आणि कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचा तपास करण्यासाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर पाटील याच्या कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT