Jumbo Hospital Pune Sakal
पुणे

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी सुकाणू समिती स्थापन

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रशासकीय सेवेतील सहा अधिकाऱ्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीला पारदर्शक काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या समितीने पारदर्शक काम केले आहे. त्यामुळे या रुग्णालयांच्या उभारणीत राजकारण्यांचा संबंध येतोच कुठे, असा सवाल पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १२) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी हा सवाल केला आहे. पवार म्हणाले, ‘‘विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा समावेश होता. या समितीने या दोन्ही रुग्णालयांच्या उभारणीची कार्यवाही नियमानुसारच केली असल्याचे मला कोरोना आढावा बैठकीत सांगण्यात आले आहे.’’

पुणे शहर व जिल्ह्यातील आठवड्याची कोरोना आढावा बैठक पवार यांनी शनिवारी (ता.१२) घेतली. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, शनिवारच्या कोरोना आढावा बैठकीत पहिल्यांदा जम्बो कोविड रुग्णालये उभारणी याच विषयावर चर्चा झाली. त्यावेळी विभागीय आयुक्त राव यांनी बैठकीत ही माहिती दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, ‘‘पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने, रुग्णसंख्या वाढली होती. कोरोनाच्या सर्व रुग्णांना कोरोनावरील मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आणि पिंपरी चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर प्रत्येकी एक जम्बो कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. यासाठीची जबाबदारी महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे देण्यात आली.

ही दोन्ही रुग्णालये तत्काळ सुरु करण्यासाठी राज्य सरकारने संबंधित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आणि तीन समित्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी संस्था ही पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण असेल, असे निश्‍चित केले. या सर्व समित्यांनी नियमानुसार लघु निविदा काढून ही रुग्णालये उभारली आहेत.’’

‘कोव्हॅक्सिन लसीसाठी पाठपुरावा करू’

शहर व जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात पुणे शहर व पिंपरी चिंचवड मागे पडले आहे. मुलांसाठी देण्यात येत असलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुलांच्या लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी या लसीच्या उपलब्धतेसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. असेही पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT