पुणे

Pune Crime : ओतूर पोलीसांनी हरवलेले अंदाजे चार लाख रूपयाचे १९ मोबाईल सायबर सेलच्या मदतीने शोधले

पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दित गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेणेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्व पोलीस ठाण्याना सुचना दिल्या होत्या

पराग जगताप

Pune Crime - जुन्नर येथील पोलीस कडून परीसरातील नागरिकांचे हरवलेले एकूण १९ मोबाईल चा शोध लावून ते नागरीकांना परत केले असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागिय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दित गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेणेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्व पोलीस ठाण्याना सुचना दिल्या होत्या कि हरवलेले व गहाळ झालेल्या मोबाईल चा शोध लावावा त्याप्रमाणे ओतूर पोलीसांनी मोबाईल शोधकामी पथक नेमून गहाळ मोबाईलची तांत्रिकदृष्ट्या माहीती प्राप्त करून शोध घेतला असता वन प्लस,विवो,रेड मी,ओपन,सॉमसग,आय टेन,पोकळ,ऑनर अशा विविध कंपनी मॉडेलचे एकुण १९ मोबाईल हस्तगत करणेत आले आहे.

सदर मोबाईल बुधवारी पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते नागरीकांना वाटप करण्यात आले.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,पोलीस हवालदार महेश पटारे,नरेंद्र गोराणे,बी.बी.तळपे,पोलीस नाईक डी.आर.पालवे,पुणे ग्रामीण सायबर ठाण्याचे पोलीस हवालदार महेश गायकवाड,पोलीस नाईक सुनिल कोळी, चेतन पाटील व पोलीस मित्र छोटू मणियार यांनी केली. यावेळी उपस्थित सर्वाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT