Pune nasa Sakal
पुणे

Pune : अवघ्या ११ वर्षाच्या रोहनचे छोटे उपकरण नासाद्वारे अवकाशात 'झेपावणार’

विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवणारी ‘क्यूब इन स्पेस प्रोग्राम’ नावाची योजना नासाने आखली आहे

सकाळ वृत्तसेवा

Pune - अवघ्या ११ वर्षाचा रोहन भंसाळी! पण त्याच्या विज्ञानाच्या आवडीमुळे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकला आहे. पृथ्वीच्या वातावरणातील अतिनील किरणांच्या अभ्यासासाठी रोहनने एका उपक्रमाची संकल्पना मांडली आणि ती प्रकल्पाद्वारे प्रत्यक्षातही आणली.

त्याच्या याच उत्तम निर्मितीची अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दखल घेतली असून, क्यूब इन स्पेस प्रोग्रामच्या माध्यमातून हे उपकरण आकाशात झेपावणार आहे.

विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवणारी ‘क्यूब इन स्पेस प्रोग्राम’ नावाची योजना नासाने आखली आहे. यात वास्तविक जगातील किंवा पृथ्वीशी संबंधित समस्यांबाबत छोट्या पातळीवरील प्रयोग केले जातात. यातच ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना तळहातावर मावेल एवढा उपग्रह तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

अंतराळात जाणारे मनुष्य, सामान आणि यान यांचे अती तीव्र अल्ट्रा-व्हायोलेट किरणोत्सर्गापासून (यूव्ही, सी, बी, ए) अधिक चांगले रक्षण व्हावे, यासाठी विविध औद्योगिक साहित्याचा यात अभ्यास करण्यात येणार आहे. यामध्ये रोहन भंसाळी याच्या प्रयोगाचीही निवड झाली आहे. यासाठी नासाच्या चमूने विविध पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे चाचण्या घेतल्या. रोहण विद्या व्हॅली स्कूलमध्ये शिकत आहे.

असे आहे रोहनचे उपकरण -

रोहन याने तयार केलेल्या घन आकारच्या उपग्रहात ४ अल्ट्राव्हायोलेट सेन्सॉर्स, ३ निवडक पदार्थ (रेशीम, अॅल्युमिनियम आणि प्लॅस्टिक) आणि मायक्रोप्रोसेसर यांचा समावेश आहे. या छोट्या उपग्रहाने स्थितांबरामध्ये (स्ट्रॅटोस्फिअर) केलेल्या १२ तासांच्या प्रवासात प्रत्येक ५ मिनिटांनी यात माहिती गोळा करण्यात येणार आहे. स्ट्रॅटोस्फिअर हा वातावरणातील १ लाख ६४ हजार ०४१ फूट उंचीवरील भाग असतो. त्या तुलनेत विमाने ही समुद्रसपाटीपासून ३० हजार फुटांवरून उडतात.

शाळेतील शिक्षिका जया मॅडम आणि मुख्याध्यापिका नलिनी सेनगुप्ता यांनी मला प्रोत्साहीत केले. अंतराळवीरांच्या शरिरावर अतिनील किरणांचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे,अतिनील किरणांपासून कोणता पदार्थ जास्त संरक्षण देईल आणि अंतराळवीरांचा बचाव करेल हे ठरवण्यासाठी दैनंदिन वापरात वापरले जाणारे रेशीम, अॅल्युमिनियम व प्लॅस्टिक अशा साहित्याची निवड करण्यात आली.

रोहन भंसाळी, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी घटना, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Crime News : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात... नेमका कुठं घडला प्रकार?

Ganeshotsav 2025 : 'शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम; गणेशोत्सवासाठी नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Online Gaming Bill: ऑनलाईन गेमिंग बिल! केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नेमका कायदा काय? कशावर येणार बंधन?

SCROLL FOR NEXT