Pune Accident 
पुणे

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Pune Accident News Update: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग आला आहे.

कार्तिक पुजारी

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी बारचे मालक, मॅनजर सचिन काटकर याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. तिघांना पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे.

पुण्यातील अपघातामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी, कोरेगाव परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबचे मालक आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा आणि सचिन काटकर असं त्यांची नावे असल्याचं समजते. अल्पवयीन मुलांना दारु दिल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

४० लाखांचा कर न भरता आरोपी आलिशान पोर्शे कार चालवत होता. याप्रकणी आरटीओ कारवाई करण्याची शक्यता आहे. शिवाय शोरुम मालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परवाना नसताना वडिलांनी आरोपीला कार दिल्याची माहिती आहे.

कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. वडिलांनीच पोर्शे कार चालवायला दिली होती. मद्यप्राशन करत असल्याची माहिती वडिलांना होती. त्यांनीच मित्रांसोबत मद्यपार्टी करण्याची परवानगी दिली होती, असा कबुलीजबाब अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी अल्पवयीन मुलाचा बारमध्ये दारु पित असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

रविवारी रात्री बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा दारु पिऊन पोर्शे कार चालवत होता. त्याने एका टू-व्हीलरला धडक दिली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपीला जामीन देखील मिळाला आहे. यावरुन पुण्यासह राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सखोल तपासाचे आदेश दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT