Girish Bapat sakal
पुणे

Girish Bapat : कसबेकरांना पत्र लिहिण्यास कारण की.....

भाजपचे खासदार गिरीश बापट हे कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय नाहीत. पण त्यांनी पत्र लिहून मदतीला धावले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भाजपचे खासदार गिरीश बापट हे कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय नाहीत. पण त्यांनी पत्र लिहून मदतीला धावले आहेत.

पुणे - भाजपचे खासदार गिरीश बापट हे कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय नाहीत. पण त्यांनी पत्र लिहून मदतीला धावले आहेत. गेली तीन दशके मतदारांच्या संपर्कात असलेल्या बापाट यांनी आज कसब्यातील मतदारांसाठी पत्र लिहिले आणि भाजपला पुन्हा एकदा विजयी करा असे भावनिक आवाहन केले आहे.

बापट यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे:

मतदार बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार.

कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ताताई टिळक यांच्या दुर्देवी निधनामुळे पोटनिवडणुक होते आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत, परंतु कसब्यातील मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी अनेक दशके भक्कमपणे उभा राहिला आहे, याहीवेळेस तो राहणार आणि विजयाची परंपरा कायम राहणार, याबाबत माझ्या मनात विश्वास आहे.

पुणे शहर व कसब्याने मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे. सर्व समाजांचा कमावलेला विश्वास ही माझी दौलत आहे. याच कसब्याने माझ्या सार्वजनिक जीवनाला आणि राजकीय कारकिर्दीला आकार दिला. नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री या माझ्या प्रवासात कसब्याचे स्थान विशेष राहिले आहे. प्रत्येक घटकाशी संवाद ठेवायचा, कार्यकर्त्याशी मैत्रीजोडायची, या माझ्या नीतीमुळे उदंड प्रेम मला लाभले. खूप कामे मार्गी लावता आली.

भाजपाचा हिंदुत्वाचा विचार, विकास आणि राष्ट्रीयत्वाशी नाते सांगणारा आहे. आणि म्हणूनच सारा कसबा सदैव भाजपाला साथ देत आलेला आहे. यामुळेच कसबा म्हणजे भाजपा, कसब्यात कमळच हे समीकरण अभेद्य आहे, अजेय आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत तुमचे पाठबळ भाजपालाच राहिले आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गतीमान विकास सुरू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला पुन्हा गती आलेली आहे. दाखवण्यासाठी नव्हे तर भविष्य समृद्ध करण्यासाठी कामे करायला हवीत, यावर माझा विश्वास आहे. पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाने हे कृतीतून दाखवून दिले आहे. हेमंत रासने हा आमचा कार्यकर्ता या पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षांचा उमेदवार आहे.

तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचा तीनदा अध्यक्ष, गणेश मंडळाचा सेवाभावी कार्यकर्ता असलेल्या हेमंतने सोपवलेली जबाबदारी नेहमीच कार्यक्षमतेने पार पाडलेली आहे. या प्रत्येक भूमिकेला न्याय दिलेला आहे. तो कसब्याचा आमदार म्हणूनही आपले कर्तव्य चोख पार पाडेल. या पोटनिवडणुकीत त्याच्या आणि भाजपाच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. विचार आणि विकासावरील आपली निष्ठा मतपेटीतून पुन्हा व्यक्त करा, ही माझी कळकळीची विनंती आहे.

धन्यवाद,

गिरीश बापट,

खासदार, पुणे

भारतीय जनता पार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT