Khadakwasala-Dam
Khadakwasala-Dam sakal
पुणे

Khadakwasala Project : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर किती पाणीसाठा शिल्लक आहे? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला प्रकल्पांत सध्या पुणे शहराला येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे - पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर ९.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात केवळ ०.१३ टीएमसीने घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पांत सध्या पुणे शहराला येत्या १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला प्रकल्पात खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चार धरणे येतात. या चार धरणांची मिळून एकूण पाणी उपयुक्त पाणीसाठा हा ३१.२७ टीएमसी इतका आहे. यापैकी सुमारे निम्मा पाणीसाठा हा सिंचनासाठी राखीव असतो. याशिवाय काही पाण्याचे बाष्पीभवन होत असते. पुणे शहराला दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी आवश्‍यक असते.

परंतु, उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही गेल्या वर्षी महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय उन्हाळी पिकांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात येते. दिले जाते. या उन्हाळी आवर्तनासाठी आवश्‍यक असणारे पाणी या सर्वांची गोळाबेरीज करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे पाणी पाहता, पुणे शहराला येत्या १५ जुलैपर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

टेमघर धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा हा ३.७१ टीएमसी, वरसगाव धरणांचा १२.८२ टीएमसी, पानशेतचा १२.७७ टीएमसी आणि खडकवासला धरणाचा १.९७ टीएमसी असा खडकवासला प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा ३१.२७ टीएमसी इतका आहे.

`खडकवासला’तील उपलब्ध साठा (टीएमसीमध्ये)

टेमघर --- ०.२४ (६.४६ टक्के)

वरसगाव --- ५.८२ (४५.३६ टक्के)

पानशेत --- २.६० (२४.४० टक्के)

खडकवासला ---१.१२ (५६.८२ टक्के)

उपलब्ध एकूण पाणीसाठा --- ९.७८ (३१.२७ टक्के)

गेल्या वर्षीचा आजअखेरचा साठा --- ९.९१ (३४.०० टक्के)

दोन वर्षापुर्वींचा आजअखेरचा साठा --- ११.७६ (४०.३५ टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT