पुणे

पुणेकरांनो सावधान; नदीपात्रात पार्किंग करू नका!

सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शुक्रवारी चार धरणांमधील पाणीसाठ्यात रात्रीतून सुमारे एक अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतील पाणीसाठा 21.08 टीएमसी (72.30 टक्के) इतका झाला आहे. खडकवासला आणि वीर धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणी जाऊ नये. तसेच वाहने पार्किंग करू नयेत, असा सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी मुठा नदीतून 11 हजार 705 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला होता. तो आज सकाळी पाच हजार 136 क्युसेक करण्यात आला आहे. वीर धरणातून 32 हजार 214 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. तो सकाळी कमी करून 23 हजार 127 क्युसेक करण्यात आला आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री आठ ते आज शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 110 मिलिमीटर, वरसगाव 134, पानशेत धरणाच्या क्षेत्रात 142 मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 14 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
  
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.94    (52.19)
वरसगाव 8.57   (66.80)
पानशेत 8.61  (80.80)
खडकवासला 1.97  (100)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT