पुणे

Pune : खडकवासला धरण पाच वेळा भरेल, एवढे पाणी सोडले

जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे सव्वा टीएमसी पाणी शहर परिसराला पिण्यासाठी घेण्यात आले.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणाची साठवण क्षमता १.९८ टीएमसी आहे. यंदा या धरणातून आज अखेर १० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरण पाच वेळा भरेल एवढं आहे.

खडकवासला धरण १५ जुलै रोजी पूर्ण भरण्याच्या मार्गावर असताना कालव्यातून शेतीला पाणी सोडले. कालवा सलग ६० दिवस सुरु होता. तो मंगळवारी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी बंद केला आहे. या दरम्यान कालव्यातून सुमारे पाच टीएमसी पाणी दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यातील शेतीला दिले.

दरम्यान, कालव्यातून पाणी सोडले पण पावसाचा जोर वाढला होता. खडकवासला धरण २२ जुलै रोजी १०० टक्के भरल्याने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. जुलै महिन्यात या १७ ते २३ जुलै या दिवशी कोकण व कोल्हापूरला जास्त पावसाचा मोठा फटका बसला होता. खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी जास्त झाला तसा धरणातील पाणी सोडण्याचा विसर्ग कमी जास्त केला होता. अशा प्रकारे साडेचार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. हे पाणी मुठा नदीतून उजनीला जाऊन मिळते.

जुलै, ऑगस्ट आज अखेर दरम्यान सुमारे सव्वा टीएमसी पाणी शहर परिसराला पिण्यासाठी घेतले. कालव्यातील पाच टीएमसी, नदीत साडेचार टीएमसी, पिण्यासाठी सव्वा टीएमसी असे मिळून दहा टीएमसी पाणी खडकवासला धरणातून सोडले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून पावसाळ्यातील दुसरे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात धरणात जमा होणारे पाणी जास्तीतजास्त साठवणे हा मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात कालव्यातून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्यासाठी तलाव भरले जातात. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीच्या 'नो-लुक' शॉटची चर्चा;नेट्समध्ये ठोकले तुफानी षटकार, BCCI ने शेअर केला VIDEO

Latest Marathi News Live Update : राजकारणात प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार - मंत्री उदय सामंत

Rajapur Nuclear Power Project : 'आता प्रकल्पाला विरोध कराच, समोरून काय करतो ते बघाच..'; खासदार नारायण राणेंचा अणुऊर्जा प्रकल्पावरून विरोधकांना थेट दम

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

SCROLL FOR NEXT