मनसे sakal
पुणे

Pune : आता जर दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार

खडकवासला येथील रास्तारोको आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक; पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात

निलेश बोरुडे

किरकटवाडी : मागील चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एक महिन्यात काम होईल, दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल अशी पोकळ आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 31 मे 2023 पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले आहे.

आता मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला त्यांच्या कार्यालयात जाऊन काळं फासणार आहोत अशी तीव्र प्रतिक्रिया देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिला आहे. मनसेच्या वतीने खडकवासला धरण चौकात रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सिंहगड रस्त्याचे काम जागोजागी अर्धवट असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. अपघातामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव जात असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. खडकवासला गावातील काम भैरवनाथ यात्रोत्सवापूर्वी पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र अद्याप अर्धेही काम पूर्ण झाले नाही. रस्त्याचे काम सुरू असल्याने गावातील रहिवासी, व्यावसायिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने वाहतूक बंद असून त्याचा व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.

सध्या बाह्यवळण रस्त्यावरुन वाहतूक वळविण्यात आली आहे, मात्र अर्धवट काम व सुरक्षेबाबत उपाययोजना न केल्याने बाह्यवळण मार्गावर अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून आता जर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन काम पूर्ण केले नाही तर पुढील परिणामांना त्यांनी तयार रहावे,

असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिला. आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड व हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महादेव मते,

खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते, प्रसाद मते, शिवाजी मते, कैलास दांगट, निकिता चाकणकर,सोनाली पोकळे, अरविंद मते, अतुल मते, रमेश करंजावणे,चंदन कड, कालिदास चावट, प्रविण आंग्रे आदी उपस्थित होते. रविवार असल्याने पर्यटक व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हवेली पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT