पुणे

खरीपासाठी पुणे जिल्ह्यात १.९४ लाख टन खते मंजूर

CD

खरिपासाठी जिल्ह्यात १.९४ लाख टन खते मंजूर
-----------
१४ मेपर्यंत ७६,७६९ टन खते शिल्लक; कृषी विभागाकडून नियोजन सुरू
------
ॲग्रोवन वृत्तसेवा
-----------------
पुणे : पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी वेगाने सुरू झाली असून शेतकऱ्यांकडून खतांची मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविण्यात आली आहे. कृषी विभागाकडे यंदाच्या खरीपासाठी सुमारे १ लाख ९४ हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून त्यास आयुक्तालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यंदा १४ मेपर्यंत सुमारे ७६ हजार ७६९ मेट्रिक टन खतांची उपलब्धता झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र दोन लाख दोन हजार हेक्टर इतके आहे. यंदा दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः भात, मका आणि सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याने खतांच्या मागणीतही वाढ अपेक्षित आहे. यासाठी कृषी विभागाने आगाऊ नियोजन सुरू केले आहे.

यंदा युरिया, अमोनियम सल्फेट, एमओपी आणि एसएसपी या सरळ खतांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात सुमारे दोन लाख मेट्रिक टन खतांची मागणी झाली होती. त्यावेळी काही भागांत कमी-अधिक पुरवठ्यामुळे खतटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा झाल्यामुळे काही प्रमाणात खतसाठा शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.

सध्या जिल्ह्यात उन्हाळी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असून अनेक शेतकऱ्यांनी खरीपपूर्व तयारी सुरू केली आहे. मॉन्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज होत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते आणि बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाने मे महिन्यापासूनच नियोजन सुरू केले आहे.

गावपातळीवरील कृषी सेवा केंद्रांमार्फत खते व बियाण्यांचा पुरवठा सुरू असून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. खत किंवा बियाण्यांबाबत अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
---------
चौकट
खतांचा आढावा
खतांचा प्रकार --- मंजूर खते -- उपलब्ध खते (आकडेवारी टनांमध्ये)
युरिया -- ८९५०० -- १६,११७
डीएपी -- १४,२०० --- ३९२१
एमओपी -- ४,५०० -- १०५६
एसएसपी -- १८,४०० -- ११,५१५
संयुक्त, मिश्र खते -- ६७,९०० -- ४४,१६०
एकूण -- १,९४,५०० -- ७६,७६९
---------
कोट
“यंदा खरीप हंगामासाठी जवळपास ७६ हजार टन खतांचा साठा उपलब्ध असून खतपुरवठा सुरळीत सुरू आहे. खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी गरजेनुसार खते खरेदी करून त्यांचा वापर करावा. त्यामुळे पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.”
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या चोरीचा पैसा शेअर बाजारात? ३० बँक खाती गोठवली, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT