crime sakal
पुणे

दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने पादचाऱ्यास मारहाण करीत खुन

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हडपसर मुंढवा रस्त्यावरील साई फर्निचर दुकानासमोर घडली.

अशोक शंकर राव (वय 30, रा. भोईराज सोसायटी, मुंढवा) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सागर शंकर राव (वय 20) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन 20 ते 22 वर्षे वयाच्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे कंपनीमध्ये साफसफाईचे काम करतात. तर त्यांचे मोठे भाऊ अशोक राव हे बिगारी काम करत होते. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते मुंढवा येथे काम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते.

दरम्यान, ते रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. ते हडपसर मुंढवा रस्त्याने मुंढवा येथील साई फर्निचर या दुकानासमोरुन पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच 12 टिबी 4023) त्यांना पाठीमागून जोरात धक्का दिला. त्यावेळी राव यांनी संबंधित दुचाकीस्वारांना त्याचा जाब विचारला. तेव्हा, दुचाकीवरील तरुण व त्यांच्यात वाद सुरु झाले. त्यानंतर तरुणांनी राव यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी जबर मारहाण केल्यामुळे राव यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत त्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाले. नागरीकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT