Attack sakal
पुणे

Pune News : पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार

पाणीपुरीचे पैसे मागितल्यावरून विक्रेत्याला दोघांनी मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला

सकाळ वृत्तसेवा

पुणे- पाणीपुरीचे पैसे मागितल्यावरून विक्रेत्याला दोघांनी मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री शनिवारवाड्याजवळ पाणीपुरी स्टॉलवर घडली.

याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाठम यांचा शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास रिक्षातून दोघेजण आले.

त्यांनी फिर्यादीला धमकी देत ‘पाणीपुरी खिला, तू अपने भाई को बुला ले’ असे सांगितले. जाठम यांनी त्यांना पाणीपुरी दिली. त्यानंतर पाणीपुरीचे पैसे मागितले असता दोघांनी विक्रेत्याला मारहाण केली. तसेच, चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple Darshan: भीमाशंकर मंदिर सर्वांसाठी खुले! दर्शनाचे नियम आणि वेळेत झाले बदल

Uruli Kanchan Rain : उरुळी कांचन येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साठण्याने वाहतुकीला अडथळा

Pune Rain : पुण्यात पावसाची शक्यता नाहीच; प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र

Katraj News : कात्रज घाट आणि वनपरिक्षेत्रात मेडिकल वेस्टेजचे ढीग;पर्यावरण व वन्यजीवांसमोर गंभीर धोका

TET Exam : ‘टीईटी’ परीक्षेत दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT