Pune-Kolhapur Sahyadri Express warm welcome at railway station at Kale Borate Nagar Sakal
पुणे

Pune-Kolhapur Sahyadri Express : पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसचे काळे बोराटे नगर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत

काळे बोराटे नगर अर्थात सासवड थांब्यावर ही सह्याद्री एक्सप्रेस गाडी थांबणार

कृष्णकांत कोबल

हडपसर : नव्याने सुरू झालेल्या पुणे ते कोल्हापूर या सह्याद्री एक्सप्रेस या गाडीचे काळे बोराटे नगर येथील सासवड रेल्वे स्थानकावर नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. या गाडीला येथे थांबा मिळाल्याने वेळोवेळी सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, मिरज या ठिकाणी जाणाऱ्या हडपसर परिसरातील नागरिकांनी त्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

काळे बोराटे नगर अर्थात सासवड थांब्यावर ही सह्याद्री एक्सप्रेस गाडी थांबणार आहे. ही गाडी चालू झाल्यामुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, मिरज या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना अतिशय सोईस्कर झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी या गाडीच्या चालकांचा भाजपाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करीत गाडीचे स्वागत केले.

अश्विनी व योगेश सूर्यवंशी, गीता डावी, माया उनेचा, गायत्री राजपुरोहित, मनीषा बिनवडे, रणजीत सूर्यवंशी, उमेश भुजबळ, अमित वाडकर, बापू देवकाते, उमेश काळे, देवसिंग राजपुरोहित, अण्णा धायंगिडे, तात्या किलोरे, धनंजय बोराटे, रमेश बोराटे, बाप्पू मिरेकर, सचिन सातव, संजय भुजबळ, सचिन काशीद, सोमनाथ ताठे, समीर भुजबळ, सुनील जाधव, मदनलाल उनेचा, प्रभाकर माने, बळवंत पाटील, संजय देशमुख, गणेश कळसाईत आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

SCROLL FOR NEXT