Koregaon Park Hit And Run Esakal
पुणे

Koregaon Park Hit And Run: कोरेगाव पार्कमध्ये हीट अँड रन! आलिशान कारने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

Pune Koregaon Park Hit And Run: गेल्या काही महिन्यांपूर्वीही कल्याणीनगरमध्ये अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये अल्वपयीन मुलाने एका तरुण आणि तरुणीला उडवले होते.

आशुतोष मसगौंडे

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. कोरेगाव पार्क परिसरात भरधाव आलिशान कारने दुचाकीस्वाराला उडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या प्रकरणातील कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या गुगल इमारतीसमोर रात्री १ वाजता घडली घटना घडली आहे. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वीही कल्याणीनगरमध्ये अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये अल्वपयीन मुलाने एका तरुण आणि तरुणीला उडवले होते.

दरम्यान हा अपघात केलेल्या आरोपीचे नाव आयुष प्रदीप तयाल असे असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो हडपसर येथे राहत असल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर पळून गेला होता.

काल रात्री रात्री 01: 30 ते 1: 35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर MH12 NE 4464 क्रमांकाच्या कारने प्रथम ऍक्टिवा वरील तिघांना धडक दिली. त्यात ते तिघे पडले त्यांना किरकोळ मार लागला त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या रुउफ अकबर शेख यास पाठीमागून जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

मृत्यूमुखी पडलेला पीडित रुउफ अकबर शेख याला अपघातानंतर तात्काळ नोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या अपघातातील कारचालक आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा क्रमांक प्राप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT