sakal vidya sakal
पुणे

Pune : स्पर्धा परीक्षांबाबत उद्या कोथरूडमध्ये मार्गदर्शन

मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिरात चर्चासत्र; करिअरच्या संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, याबाबत बहुतांश विद्यार्थी व पालकांना माहिती नसते. अशा परीक्षांसह इंजिनिअरिंग, मेडिकल व सायन्समधील करिअरच्या संधी व प्रवेश परीक्षांबाबत रविवारी (ता. २३) सकाळी १० वाजता मयूर कॉलनी- कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिरात चर्चासत्र आयोजित केले आहे.

‘सकाळ विद्या’ व एक्सलंट एज्युकेशन (ईएक्सईडी) यांच्यातर्फे आयोजित चर्चा सत्रात, इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि प्रवेश; राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी?; एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा अशा परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल; अकरावी, बारावीसह सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन;

देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे. यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यांना करिअर व समुपदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव असलेले प्रा. आशिष दुबे मार्गदर्शन करणार आहेत.

काय? कधी? केव्हा? कुठे?

काय? : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी

कधी? : रविवार, ता. २३ एप्रिल २०२३,

केव्हा? : सकाळी १० वाजता

कुठे? : बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड

प्रवेश

विद्यार्थी आणि पालकांसाठी विनामूल्य

नावनोंदणी आवश्यक

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT