crime news  esakal
पुणे

Pune Koyta Gang : संगमवाडीत हातामध्ये कोयते, बिअरच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर दहशत

येरवडा, हत्यारे आणि दारूच्या बाटल्या घेऊन धमकी

सकाळ वृत्तसेवा

वडगाव : हातामध्ये कोयते, बिअरच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर दहशत माजवीत सहा दुचाकीवरून आलेल्या दहा ते बारा गुंडांनी संगमवाडीकरांना रात्रभर दहशतीखाली ठेवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रात्रीचे जेवण करून बाहेर बसलेल्या महिला, वृद्ध आणि लहान मुले चांगलीच भेदरली. यावर कळस म्हणजे कोयता गॅंगची माहिती देण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा या गुंडांनी पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग केला.

येरवड्यातील संगमवाडी येथे सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान सुरू झालेला हा थरार मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडीतील दोन गटांमध्ये रस्त्यात का उभा राहिला, या किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. यात सहभागी पाच-सहा तरुणांच्या एका गटाने पुणे शहरातील काही गुंडांना बोलावून घेतले. सहा दुचाकी वरून आलेल्या या गुंडांनी हातात कोयते आणि बियरच्या बाटल्या फोडण्यासाठी घेतलेल्या होत्या.

हे सर्व गुंड संगमवाडीतील रस्त्यांवरून दुचाकीवरून फिरत होते. गाववाल्यांना दाखवतो अशी धमकी देत होते. त्यामुळे संगमवाडी येथील काही नागरिक याची तक्रार देण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यांचा पाठलाग या गुंडांनी येरवडा पोलीस ठाण्यापर्यंत केला. रात्री एक वाजता पोलीस ठाण्यातून घरी जाताना येरवडा ते सादवाल बाबा दर्गा जवळ या गुंडांनी पुन्हा नागरिकांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे भीतीपोटी नागरिक पर्णकुटी जवळ थांबले.

तेथे पोलीस आल्यानंतर नागरिकांना घरी नेऊन सोडण्यात आले. पोलिसांनी रात्री या गुंडांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. हा थरार मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता.गुंडांनी संगमवाडीत दहशत माजवल्याचे सीसीटीव्ही फुटेजही नागरिकांनी पोलिसांना दाखवले. झालेल्या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी संगमवाडी येथील अनेक प्रतिष्ठित गावकरी व तरुण हे मंगळवारी येरवडा पोलीस ठाण्यात जमले होते. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

बाळकृष्ण कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा)

संगमवाडी मध्ये रात्री कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला, ही गोष्ट खरी आहे. परंतु यामध्ये बाहेरील गुंडांसोबत स्थानिक तरुणही सहभागी असल्याने अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. दोन्ही गटांची बैठक घेऊन सामोपचाराने मार्ग काढण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे. बैठक बोलावणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. संगमवाडीतील अवैध धंदे बंद केले जातील. अवैध धंद्या विरोधात गावकऱ्यांनीही जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे.

अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ?

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्याचा धाक नसल्याने संगमवाडी परिसरात मटका, सोरट जुगार आणि गांजा आणि रात्रभर चालणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गाड्या यासारख्या अवैध गोष्टींमुळे तरुण वाम मार्गाला लागत आहेत. पोलिसांनी या भागात कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT