rupali-chakankar 
पुणे

पुणे : कुचिक प्रकरणातील पीडीत मुलगी सुखरुप - रुपाली चाकणकर

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य कायदेशीर कारवाईचे पोलिसांना आदेश

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) याच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी सुखरुप असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. (Pune Kuchik case Suffering girl is safe now says Rupali Chakankar)

चाकणकर म्हणाल्या, पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुचिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीडित मुलीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, वडगाव शेरी येथील शाळेत विद्यार्थीनीवर झालेल्या हल्ला प्रकरणी बोलताना चाकणकर म्हणाल्या, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना काल पुण्यात घडली. पीडित मुलीवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक आहे.

वडगाव शेरीमधील या पीडित मुलीवर हल्ला करणाऱ्या तरुणानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. हल्ला झालेली मुलगी दहावीची विद्यार्थिनी असून आजपासून तिची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळं उपचार सुरू असताना तिला हॉस्पिटलमधून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT