crime esakal
पुणे

Pune : कुरुलकर यांनी पाकिस्तानी आयडीवर केले मेल; हनीट्रॅप प्रकरण

२०२२ मध्ये कुरुलकर यांनी सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरत भेट दिली आहे. तेथे ते कोणाला भेटले याची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान काही नावे निष्पन्न झाली आहेत,

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानमधून काही मेल आले आहेत. त्या मेलला त्यांनी प्रतिसाद दिला. तसेच पाकिस्तानी मेल आयडीवर मेल केल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आले आहे.

मेलची माहिती गुगुलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. मात्र त्यात नेमके काय संभाषण झाले हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले आहेत.

२०२२ मध्ये कुरुलकर यांनी सहा देशांना शासकीय पासपोर्ट वापरत भेट दिली आहे. तेथे ते कोणाला भेटले याची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान काही नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती एटीसएच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

कुरुलकर यांच्यावतीने ॲड. ऋषिकेश गानू यांनी युक्तिवाद केला. रिमांड रिपोर्टमध्ये असलेल्या कारणांचा विचार केला असता कुरुलकर यांच्या पोलिस कोठडीची गरज नाही. त्यांची पूर्वी देखील एटीएसने चौकशी केली आहे.

तसेच पुढील तपासासाठी आम्ही सहकार्य करण्यात तयार आहोत, असा युक्तिवाद ॲड. गानू यांनी केला. आरोपीने त्यांच्या डिव्हाईसमधून काय डेटा डिलीट केला याची चौकशी करणे आवश्‍यक आहे. हे प्रकरण खळबळजनक आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गुन्ह्याचा सखोल तपास होणे आवश्‍यक आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पोलिस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ :

एटीएस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी कुरुलकर यांना येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. एटीएसने केलेल्या तपासाची माहिती देत कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने कुरुलकर यांच्या पोलिस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ केली आहे.

जप्त केलेल्या डिव्हाईसच फॉरेंसिक रिपोर्ट दाखल :

कुरुलकर यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्याचा

फॉरेंसिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला. या डिव्हाईसमधील काही डेटा त्यांना डिलीट केला आहे, असे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. २०१९ नंतर मी शासकीय पासपोर्टवर कुठेही गेलेलो नाही. पासपोर्टच्या नोंदी तपासल्या असता ते लक्षात येर्इल, असे कुरुलकर यांनी न्यायालयास सांगितले.

पोलिस कोठडीत वाढ करण्याची कारणे :

- फॉरेंसिक रिपोर्ट अहवालाच्या अनुषंगाने तपास करायचा आहे

- बँक स्टेटमेंटमधील नोंदींची चौकशी करायची आहे

- शासकीय पासपोर्ट वापरून आरोपी कोणत्या देशांत गेला

- तसेच तेथे कोणाला भेटला याची माहिती जमा करायची आहे

- या गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली याचा तपास सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT