शेतकरी आत्महत्या Sakal
पुणे

Pune : कर्जाच्या तगाद्यामुळे जमीनदाराची आत्महत्या

हीनोटीस घेऊन समर्थ पोलीस ठाण्यातील निकम आणि बरकडे हे सतत राऊत यांच्याकडे येत होते

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्ज प्रकरणात जामीनदार असलेल्या एका व्यक्तीने कर्जदार व पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नाना पेठ परिसरात घडली आहे. सातत्याने नोटीस बजावत त्याच्याकडून पैसे उकळून त्रास देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम, हवालदार सचिन रामचंद्र बरकडे आणि किरण भातलवांडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, राजेंद्र उर्फ राजू राऊत असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत राऊत यांच्या २३ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील राजेंद्र राऊत आणि आरोपी किरण हे मित्र आहेत. आरोपी किरण यांनी त्याच्या चारचाकी गाडीवर कर्ज घेतेवेळी राऊत यांना जामीनदार केले होते. मात्र, यानंतर किरण याने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे कोर्टाने जामीनदार असलेल्या राऊत यांना नोटीस बजावली. हीनोटीस घेऊन समर्थ पोलीस ठाण्यातील निकम आणि बरकडे हे सतत राऊत यांच्याकडे येत होते.

अटक होऊ नये या भीतीने राऊत यांनी दोघा पोलिसांना वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये देखील दिले. यानंतर देखील दोघे पोलीस त्यांच्याकडे जात होते. त्यामुळे राऊत यांनी त्यांचा मित्र असलेल्या किरणला गाडीचे हप्ते भरण्याचे सांगितले. परंतू हप्ते न भरता किरण याने राऊत यानांच जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी (दि.१२) पहाटे नाना पेठेतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT