पुणे, ता. २२ : राज्यात तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या यादीत १२ हजार ७६७ प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ हजार ७५६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. २४) प्रवेश निश्चित करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यासाठी २९ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण ४९ हजार ६११ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी तिसऱ्या फेरीत २९ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या फेरीत २२३ महाविद्यालयांतील १२ हजार ७६७ जागा उपलब्ध होत्या.
या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत पाच हजार ७६५ आणि दुसऱ्या फेरीत दोन हजार ५१२ असे एकूण आठ हजार २७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत (ता. २४) मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.