leopard attack sakal
पुणे

Pune : बिबट्याच्या हल्यात एका व्यक्तिचा मृत्यू

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार भोरगिरी-भिवेगांव- भिमाशंकर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत

राजेंद्र लोथे

चास : भिवेगांव येथे बिबट्याने केलेल्या हल्यात लक्ष्मण रामभाऊ वनघरे यांचा मृत्यू झाला असून गुरूवारी साय़ंकाळी गोठ्यामध्ये गुरे बांधण्यासाठी गेले असताना बिबट्याने हल्ला केला त्यात ते जागीच ठार झाले ते 60 वर्षांचे होते.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार भोरगिरी-भिवेगांव- भिमाशंकर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवेगांव येथे खाजगी मालकी क्षेत्रात गुरूवार ता. 19 रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान लक्ष्मण रामभाऊ वनघरे हे आपली पाळीव जनावरे गोठ्यामध्ये बांधण्यासाठी गेले व परत येताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्यामध्ये लक्ष्मण यांचा जागीच मृत्यू झाला तसेच त्यानंतर बिबट्याने त्यांच्या गळ्याच्या, शरीराचा पुढचा भाग तसेच शरीराचा काही मागील भाग खाल्ला तसेच त्या्च्या शरीरावर मोठ्या जखमाही केल्या.

जनावरे बांधायला गेलेली व्यक्ती घरी न आल्याने नागरिकांनी संशय आल्याने शोधाशोध केली असता गोठ्याच्या जवळच शोधायला गेलेल्या व्यक्तिंना बिबट्या नजरेस पडला. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला मात्र तो पर्यंत लक्ष्मण यांच्या देहाचे अनेक तुकडे बिबट्याने गिळंकृत केले होते.

या बाबत घटनेची माहिती कळताच वनविभाचे वनरक्षक ए.आर. गुट्टे, संदिप अरूण यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणून लक्ष्मण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर- चांडोली ग्रामीण रूग्णालयात आणला. पुढील तपास वनविभागाच्या वतीने सुरू असून नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी उपसभापती व संचालक विठ्ठल वलघरे यांचे लक्ष्मण हे चुलत बंधू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT