pune corona Sakal Media
पुणे

Pune Lockdown Relaxed: वाचा काय सुरु आणि काय बंद?

विनायक होगाडे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. मात्र आता पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. आज पुण्यात एकूण १८० रुग्णांची नोंद झाली आहे तर ७५१ रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा १५ दिवसांचा लॉकडाऊन कडक नसला तरी निर्बंध लागू असणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे आता अनलॉकच्या दिशेने निघालं आहे. यासंदर्भातच आता पुण्यात नवे आदेश काढण्यात आले आहे. पुण्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जाईल अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. आता पुण्यात सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी २ पर्यंत सर्व प्रकारचे दुकाने उघडी राहणार आहे; तर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहिल अशी देखील माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

उद्यापासून पुण्यात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु

2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु असणार

3. बार व रेस्टॉरंट हे फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील

4. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या सर्व दिवशी सुरु राहतील

5. महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने सर्व दिवस सकाळी 7 ते २ दुपारी वाजेपर्यंत सुरु राहतील

6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील

7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु करणेस मुभा

पुण्यात काय बंद असणार?

1. जिम, मंगल कार्यालय, उद्याने, मैदान, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार

2. पुणे मनपा हद्दीत नव्या आदेशानुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत.

3. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद असणार.

3. दुपारी 2 नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT