पुणे

घाऊक बाजारपेठा रिंगरोडलगत हलवा

CD

मार्केट यार्ड, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले इंधन बचतीचे आवाहन, सातत्याने वाढणारे इंधन दर आणि पुण्यात गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख घाऊक बाजारपेठा शहराबाहेरील रिंगरोडलगत स्थलांतरित कराव्यात. त्यासाठी १०० एकर जागा उपलब्ध करून तेथे आधुनिक आणि नियोजनबद्ध ‘लॉजिस्टिक मार्केट’ उभारण्यात यावे, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सध्या पुण्यातील बहुतांश घाऊक बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. या बाजारपेठांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वायुप्रदूषण आणि अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे बाठिया यांनी पत्रात नमूद केले आहे.

रिंगरोड परिसरात सुमारे १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. या ठिकाणी आधुनिक सुविधा, स्वतंत्र मालवाहतूक व्यवस्था, पार्किंग, गोदामे आणि ‘लॉजिस्टिक’ सेवा असलेली बाजारपेठ उभारल्यास शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा दावा चेंबरने केला आहे.

रिंगरोडलगत जागा मिळाल्यास इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, वेळेची बचत आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. पुण्याच्या व्यापारी आणि औद्योगिक विकासालाही नवसंजीवनी मिळेल. प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

SCROLL FOR NEXT