Raj Thackeray Sakal
पुणे

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

पुणेः लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवारांची भलामण केली असून शरद पवारांना चिमटे काढले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, पुणे अधी टुमदार शहर होते. आता कुठल्या कुठे पुणे पसरले आहे. ⁠माझे अजित पवार यांच्याबरोबर अनेक मतभेद असतील पण एक गोष्ट त्यांची सांगतो, अजित पवार यांनी कधी जातीपैतीचे राजकारण केले नाही. तेही शरद पवार यांच्याबरोबर राहुन देखील. राज्यामध्ये १९९९ पासून जातीपातीचं विष कालवायला सुरुवात झाली. परंतु अजित पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, असं राज म्हणाले.

आज काँग्रेसला मतदान करावं, यासाठी फतवे काढले जात आहेत. परंतु आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावं.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज राम मंदिर उभं राहिलं असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. कारसेवकांनी जे काम केलं त्यांचं फळ आज बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये अनेक विकासाची कामं अडली आहेत. मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

- जेम्स लेन प्रकरण आणले गेले. तुम्हाला जातीमध्ये गुंतवण्यासाठी. त्यामुळे शहरात काय होतेय तुम्हाला कळत नाही.

- ⁠शहराचे काय वाटोळे झाले तरी तुम्ही थंड असता, पण जातीचा विषय निघाला की पेटून उठता.

- ⁠निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत. कॅाग्रेसला मतदान करा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करा.

- हे जर फतवे काढणार असतील तर मी पण आज फतवा काढतो. हिंदूंनी मोहोळ यांना मतदान करा. महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT