Local 
पुणे

पुणे-लोणावळा लोकल जूनपासून ‘इनटाइम’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोकलचे अचूक वेळापत्रक तयार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत या मार्गावरील सर्व लोकल ‘इन टाइम’ धावणार आहेत. त्यामुळे उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे होणारा प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. सध्या ही लोकल ९४ टक्‍के वेळेवर धावत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. 

पुणे ते लोणावळादरम्यान लोहमार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत लोणावळा ते देहूरोड या चाळीस किलोमीटर अंतराच्या टप्यामध्ये प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे देहूरोडपर्यंत लोकल, मेल, एक्‍स्प्रेस या गाड्यांच्या वेळेत अचूकता आली आहे. 

देहूरोड ते शिवाजीनगर दरम्यानच्या २५ किलोमीटरच्या टप्यात ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यानंतर लोकलच्या वेळेत अचूकता येणार असून, त्या वेळेत धावू शकणार आहेत. 

दरम्यान, या लोहमार्गावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचे भारमान वाढले आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेसाठी प्रस्तावित असणारा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

कशामुळे होतो उशीर? 
पुणे ते लोणावळा लोकल प्रवासासाठी एक तास २५ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, काही वेळेला मुंबईहून किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्या उशिराने धावत असतात. त्यांना पुढे जाऊ देण्यासाठी एखाद्या स्थानकावर लोकल थांबविण्यात येते. याखेरीज काही वेळेला तांत्रिक कारणांमुळे लोकलला उशीर होत असतो. सध्या ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम अर्ध्यापर्यंतच पूर्ण झाले आहे. शिवाजीनगर स्थानकापर्यंत ते पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या वेळेत अचूकता येणार आहे.

पुणे ते लोणावळादरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन रेल्वे प्रशासन या मार्गावरील लोकलसेवेवरही निगराणी ठेवत असते. या मार्गावरील ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT