pune lonavala local train sakal
पुणे

पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठीही मिळणार पास; जाणून घ्या नियम

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोणावळा - पुणे (lonavala pune) मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका (corporation) किंवा नगर परिषदा त्यासाठीचे पास देणार आहेत. त्यानंतर रेल्वेतर्फे त्यांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात येईल.

पुणे - लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच त्यात सध्या प्रवेश दिला जात आहे. आता लोकलमधून प्रवाशांनाही प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दुसरा डोस होऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येईल. त्यासाठीचे आदेश पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

ज्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करायचा आहे, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पास काढून घ्यावेत. लोकलसाठी दैनिक तिकिट विक्री होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेतर्फे मासिक पास दिला जाईल. त्यासाठी प्रवाशांनी ते राहत असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी सांगितले. दरम्यान या बाबत महापालिका मंगळवारी कार्यपद्धती स्पष्ट करेल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT