कात्रज प्राणीसंग्रहलय पार्किंग sakal
पुणे

Pune News : कात्रज प्राणीसंग्रहलायाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची लूट सुरुच

राज्यभरातून प्राणी पाहणयासाठी पर्यटक येत असताना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज- राजीव गांधी प्राणीसंग्रहलायाच्या पार्किंगमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणांत लूट सुरुच आहे. राज्यभरातून प्राणी पाहणयासाठी पर्यटक येत असताना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.

चारचाकीसाठी तासाला दहा रुपये आणि दुचाकीसाठी दोन रुपये शुल्क असताना सातत्याने जास्तीची आकारणी करण्यात येत आहे. पार्किंगच्या ठेकेदारांविरोधात महापालिकेकडे सातत्याने तक्रार करुनही किरकोळ दंडात्मक कारवाईशिवाय काहीही करण्यात आलेले नाही.

महापालिकेकडून दोनवेळा नोटीस जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी पार्किंगमध्ये मनमानी वसुली चालू असल्याचे दिसून येते. पर्यटकांसाठी महापालिकेने राजीव गांधी वाहनतळाची सोय केलेली आहे.

हे वाहनतळ खाजगी ठेकेदारांकडून चालविले जात आहे. महापालिकेने ठेकेदारांसोबत केलेल्या करारामध्ये दुचाकीसाठी तासाला दोन रुपये आणि चारचाकीसाठी दहा रुपये दर निश्चित केलेला आहे. एवढेच पैसे ठेकेदाराने घेणे बंधनकारक आहे.

परंतु, ठेकेदाराच्या कामावर महापालिका अधिकाऱ्यांचे नसल्याने एकप्रकारे ठेकेदाराला पैसे उकळण्यासाठी पार्किंगचे रान मोकळे मिळाले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत ठेकेदाराचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चाही पर्यटकांमध्ये आहे.

दुचाकी पार्किंग केल्यास पहिल्या तासाप्रमाणे २ रुपये आकारणी करणे गरजेचे असताना अनेकवेळा पावतीवर कोणत्याही प्रकारची रक्कम न लिहता १० रुपये वसूल केले जातात. तर, चारचाकीसाठी एक तासाच्या नंतर पाच-दहा मिनीट झाले तरी जास्तीचे ३० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबर सुटीच्या दिवशी तर थेट ५० किंवा १०० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे. या पैशांची पावती दिली जाते मात्र, त्यावर कोणतीही रक्कम टाकली जात नाही.

रस्त्यांवर उभ्या केलेल्या गाड्यांकडूनही वसुली

सुटीच्या दिवशी पार्किंगमधील जागा अपुरी पडते. त्यामुळे अनेकजण गाड्या सातारा रस्त्यांवर पार्किंग करतात. अशावेळी पार्किंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना सर्सास शंभर रुपये शुल्क आकारण्यात येतो.

प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पार्किंगमध्ये पर्यंटकांची लूट चालू आहे. ठेकेदाराचे लोक पर्यटकांकडून खंडणी पद्धतीने पैसे गोळा करतात.

दिलेल्या पैशाची पावती मागितल्यास दमदाटी करतात. त्यामुळे ठेकेदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने महापालिकेला दिलेल्या निवेदनात संतोष साठे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया

राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथील पार्किंग चालकाने नागरिकांकडून जास्त पैसे घेतल्याची तक्रार आलेली आहे तसेच ठेकेदाराने पादचारी मार्ग किंवा रस्त्यावर लावलेल्या गाड्यांचे पैसे घेणे चुकीचे आहे त्यामुळे नोटीस बजावली जाईल व त्यावर कारवाई केली जाईल यापूर्वी देखील या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे महापालिकेने केलेल्या करारानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT