पुणे

पंचतारांकित हॉटेलमधील वेश्याव्यवसाय उघडकीस

CD

पुणे, ता. २७ : बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) हॉटेलमध्ये छापा टाकून परराज्यांतील मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका केली.
रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पीयूष (वय ३४, तिघेही रा. आसाम) आणि त्यांचा एक साथीदार अशा चौघांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी-बंडगार्डन रस्त्यावरील एक्साइज कॉलनीजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील तरुणींना आणून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ‘एएचटीयू’ कक्षाच्या पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पथकाने सोमवारी (ता. २६) हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. या वेळी मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या परराज्यांतील दोन तरुणी आढळल्या. या तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. आरोपी एजंट या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या सूचनेनुसार ‘एएचटीयू’ पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT