पुणे

सुशांत चिपलकट्टी स्मृती ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धा

CD

फोटो ः देव रुपारेलिया आणी ईशिता नेगी
फोटो ः पुनित सुरेश व पवन सुरेश चेहरे
फोटो ः मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया व अफिजाह रहमाधानी चेहरे
---------------
देव रुपारेलिया, ईशिता नेगीने पटकाविले विजेतेपद
सुशांत चिपलकट्टी स्मृती बॅडमिंटन स्पर्धा ः पुरुष दुहेरीत पवन सुरेश व पुनीत सुरेश विजेते


पुणे, ता. ३१ ः पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती ‘पुणे महापौर करंडक’ कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स एकोणीस वर्षांखालील गटाच्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या देव रुपारेलिया तर मुलींच्या गटात दिल्लीच्या ईशिता नेगीने आपापल्या प्रतिस्पर्धीना हरवून विजेतेपदाचा मान मिळविला.
शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीजच्या मॉडर्न बॅडमिंटन संकुलात संपलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित देव रुपारेलियाने सुमारे ४६ मिनिटांच्या खेळात सोळाव्या मानांकित उत्तराखंडच्या निश्चल चंदचा २१-१६, २१-१६ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात देव रूपारेलीने जोरदार खेळ करताना पहिली गेम २१-१६ अशी जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. १८-१६ अशा फरकाने देव आघाडीवर असताना निश्चलने सव्हिस फॉल्ट केला व त्याचा फायदा घेत देवने आपले वर्चस्व कायम राखत हा गेम २१-१६ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. विजेता देव रूपारेली कंचन स्कूल मध्ये बारावी इयत्तेत शिकत असून तो मुंबईत नितीश बॅडमिंटन अकादमीत नितीश कुमारच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
मुलींच्या एकेरी गटात अंतिम सामन्यात सतरा वर्षीय दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या ईशिता नेगीने ३६ मिनिटांच्या खेळात महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीचा २१-१९, २१-१८ असा पराभव करून जेतेपदाला गवसणी घातली. विजेती ईशिता नेगी प्रायव्हेट स्कूलमध्ये बारावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून ती नोएडा येथील सनराईज बॅडमिंटन अकादमीत साहिल खान व रेेहमानच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
मुलांच्या गटात दुहेरीच्या अंतिम लढतीत भारताच्या पवन सुरेश व पुनीत सुरेश या जोडीने इंडोनेशियाच्या आर्यबका ओक्टा डिसाबियन व मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया या जोडीवर ३२ मिनिटांच्या खेळानंतर २५-२३, २१-१९ असा विजय मिळविला.
मुलींच्या गटाच्या दुहेरीत अंतिम लढतीत सुमारे ३४ मिनिटांच्या खेळानंतर थायलंडच्या चन्थरात मर्ंदाकुल व पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन या जोडीने चौथ्या मानांकित भारताच्या दिया भीमैया व कीर्थी मंचला या जोडीला २१-१५, २१-११ असे नमवीत विजेतेपदाला गवसणी घातली.
मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया व अफिजाह रहमाधानी जोडीने भारताच्या पुनित सुरेश व दीपक राज आदिती जोडीला चुरशीच्या लढतीत २४-२६, २१-१७, २१-१६ असे पराभूत केले होते.
-----------
सुशांत चिपलकट्टी बॅडमिंटन जोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT