www.idonateaid.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून लॅपटॉप देताना संकेतस्थळाचे निर्माते नितीन घोडके (उजवीकडील) 
पुणे

नको असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोचवा

संतोष धायबर

पुणे: तुम्हाला नको असलेल्या वस्तूचे छायाचित्र काढा अन् संकेतस्थळावर अपलोड करा. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वस्तू गरजूवंत पाहतात अन् संपर्क साधून ती घेऊन जातात. अगदी मोफत. हे सर्व कामकाज चालते ते ऑनलाइन आणि सामाजिक बांधिलकेतून. गेल्या वर्षेभरात www.idonateaid.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेकडो वस्तू विद्यार्थी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम व सामाजिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या पंक्तींप्रमाणे हे सर्व काम चालते.

सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असते. परंतु, अनेकदा काय करावे हे समजत नाही. शिवाय, प्रत्येकवेळी आर्थिक मदतच केली पाहिजे असेही काही नसते. अनेकांकडे विविध वस्तू असतात. परंतु, त्या कोठे द्यायच्या, हे समजत नसते. परंतु, माहिती तंत्रज्ञान युगामध्ये हे सर्वकाही शक्य होऊ लागले आहे. शिवाय, या वस्तूंचा गरजूवंताना मोठ्या प्रमाणात उपयोगही होऊ लागला आहे, तो www.idonateaid.org या संकेतस्थळामुळे.

वर्षापूर्वी संकेतस्थळाची निर्मिती करणारे नितीन घोडके सांगतात, 'समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात होती. परंतु, त्याला मर्यादा येत होत्या. एका व्यक्तीने मदत करण्याऐवजी हजारो हात जर पुढे आले तर त्याला मोठे स्वरूप येऊ शकेल. या भावनेतून संकेतस्थळाची निर्मिती केली. संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकजण आपल्याकडे नको असलेल्या वस्तू संकेतस्थळावर अपलोड करतात. वस्तूंचे छायाचित्र पाहून गरजू संस्था व व्यक्ती त्या आमच्याशी संपर्क साधून घेऊन जातात. त्या सुद्धा पुर्णपणे मोफत. वर्षभरात संकेतस्थळाच्या माध्यमातून शेकडो वस्तू अगदी वही, पेन्सिलपासून फर्नीचर, एसी, फ्रिज, लॅपटॉप देणगी स्वरूपात विद्यार्थी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम व सामाजिक संस्थांना मोफत देण्यात आल्या आहेत.'

'सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्था व संस्थेसाठी काम करणारी माणसे Donate Aid Society या संस्थेशी जोडली गेली आहेत. आगामी काळात या संकेतस्थळाद्वारे सामाजिक संस्थेने तयार केलेली विविध उत्पादने, कृषी, सेंद्रिय उत्पादने व विविध सेवा या लोकांपर्यंत पोहचून दाते व सामाजिक संस्था यातील नाते अधिक दृढ करण्याचा मानस आहे. देणारे व घेणाऱ्यांमध्ये काम करताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा आनंद मिळत आहे. दिवसेंदिवस देणाऱयांची संख्या मोठ्या प्रणात वाढत चालली आहे,' असेही घोडके यांनी सांगितले.

  •  देणगीदार, गरजू, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था यांना तंत्रज्ञानच्या साह्याने जवळ आणणे.  
  •  तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून समाजातील अंतिम व्यक्ती पर्यंत विकास पोहचवणे.
  •  समाजातील गरीब व मागास घटकांना समाजातील उच्च व श्रीमंत घटकांकडून मदत मिळवून देणे.
  •  सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त मदत मिळवून देणे.
  •  संस्थेच्या सेवाभावी कामासाठी अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. यामुळे गोरगरिबांना मदत मिळू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT