पुणे

निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा

CD

फोटो ः

मिहिरा कर्वे, अमोघ सोमणला अव्वल क्रमांक
निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा

पुणे, ता. १६ ः पाषाणच्या सोमेश्वर फाउंडेशन आयोजित विनायकी क्रीडा महोत्सवा अंतर्गत निमंत्रित जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दहा वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे अमोघ सोमण आणी मिहिरा कर्वेने जेतेपदाचा मान मिळविला.
पाषाण सूस रोड येथील सनीज वर्ल्डच्या पेरी डॉट हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलांच्या गटात इलाइट मल्लखांब अकादमीच्या अमोघ सोमणने ८.०५ गुणांसह पहिला क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात पुणे स्पोर्ट्स अकादमीच्या मिहिरा कर्वेने ७.६० गुणांसह विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक देण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी मधुरा निम्हण, नंदकुमार वाळंज, मधुरा वाळंज, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सत्यजित शिंदे, विनायक बापट, योगेश येवले, नरेंद्र जाधव, पुरुषोत्तम जाधव, गोविंद रणपिसे, विकास हेमाडे, स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते, नरेंद्र पाटणकर हे उपस्थित होते.
निकाल :
दहा वर्षांखालील मुले : (८.०५ गुण) अमोघ सोमण (इलाइट मल्लखांब अकादमी), अर्जुन पायगुडे (संस्कृती विद्या मंदिर), ईशान दीक्षित (इलाइट मल्लखांब अकादमी). मुली : (७.६० गुण) मिहिरा कर्वे (पुणे स्पोर्ट्स अकादमी), श्रावणी इनामदार (इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी), रम्या बादगुरे (विराज स्पोर्ट्स अकादमी).
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Fire : पुण्यात स्वारगेटजवळ धावत्या शिवाई बसला भीषण आग, १७ प्रवासी थोडक्यात बचावले

Pune Crime News: पैसे स्वीकारून घटस्फोट नाकारणाऱ्या पत्नीला दणका; न्यायालयाकडून पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर

Maharashtra Live News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

DEEPTI SHARMA: शतक ठोकलं अन् इतिहास रचला! दीप्ती शर्माची अशी कामगिरी, थेट सचिन तेंडुलकरांच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री

नोव्हेंबरमध्ये ४ राशींचं नशीब चमकणार! गुरु, मंगळ अन् केतूच्या युतीने होणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT