shivajirao adhalrao patil  sakal
पुणे

Pune : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत चर्चा करू ; आढळराव पाटील

वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय भवारी म्हणाले “अजून सात दिवस नाव नोंदणी करून

डी. के वळसे पाटील

मंचर : “येथील उपजिल्हा रुग्णालयात दैनंदिन उपचारासाठी आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातून दररोज सरासरी ३०० रुग्ण येतात.कोरोनाच्या काळातही रुग्णांना उत्तम सुविधा येथे दिली जाते. रुग्णालयाचा नावलौकिक आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, आधुनिक यंत्र सामुग्री व पुरेश्या प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमवेत चर्चा करून येथील सुविधा अद्यावत करू.”अशी ग्वाही बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

मंचर (ता.आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (ता.९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अरुणा थोरात, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, रविंद्र करंजखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात,योगेश बाणखेले, घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदू वणवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार पवार उपस्थित होते.

३४१ रुग्णांची शिबिरात तपासणी करण्यात आली. आढळराव पाटील यांनी दूरवरच्या भागातून आलेल्या रुग्णांशी संवाद साधला.मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.ए जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय भवारी म्हणाले “अजून सात दिवस नाव नोंदणी करून सर्व रोगनिदान शिबिराचा लाभ गरजूंना लाभघेता येईल.शस्त्रक्रिया, औषधोपचार विनामुल्य केले जातील. विशेषतः केसपेपरसाठी लागणारे दहा रुपये शुल्क माफ आहे. या शिबिराचा फायदा महिला, वृद्ध, दिव्यांग, युवक-युवतींनी घ्यावा.”

“पुणे जिल्ह्यात कामकाजात मंचर उपजिल्हा रुग्णालय प्रथम क्रमांकावर आहे. रुग्णालयात ता.१ एप्रिल २०२२ ते ३१ जानेवारी पर्यंत ७२ हजार ४४७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. एक हजार १२० महिलांची प्रसूती येथे झाली असून लहानमोठ्या दोन हजार २८१ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. नवजात बालक उपचार केंद्रात ७२५ बालकांवर उपचार केले आहेत.”

डॉ.एस.ए जाधव, वैद्यकीय अधीक्षक मंचर उपजिल्हा रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT