pune sakal
पुणे

Pune : मांजरी रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य छत बसले प्रतिक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची

येथील बहुप्रतिक्षीत रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीतील काम अंतीम टप्प्यात आले आहे.

कृष्णकांत कोबल

मांजरी : येथील बहुप्रतिक्षीत रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीतील काम अंतीम टप्प्यात आले आहे. रूळावरील मुख्य छताचे काम सध्या सुरू असून महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील काम धिम्या गतीने सुरू असल्याने पुलावरील वाहतूकीसाठी प्रवाशांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन पाच वर्षे होत आली आहेत. वारंवार मुदतवाढ घेऊनही त्याचे काम अपूर्णच आहे. थेट रेल्वे रूळावरील व रूळाखालील भुयारी मार्गाच्या कामासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक, सुरूवातीला त्यामध्ये आलेल्या तांत्रीक अडचणी, यामुळे पुलावरून वाहतूक.सुरू व्हायला उशीर लागेल, असे निदर्शनास येते होते. मात्र, सध्याचे कामाचे चित्र पाहता रेल्वे रूळावरील काम अंतीम टप्प्यात आलेले दिसत आहे.

एकीकडे रेल्वेच्या अखत्यारीतील काम पूर्णहोत आले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामाला गती दिसत नाही. मुख्य पुलाच्या कामासह दोन्हीचे बाजूच्या सेवा रस्त्यांचे कामही रखडलेले आहे. काम पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना वेळोवेळी अश्वासने ऐकायला मिळत आहेत. मात्र, दिवसेंदिवस हे काम पुढे ढकलत असल्याने प्रवासी वैतागले आहेत. दूरवरून करावा लागत असलेला प्रवास, पर्यायी रस्त्यांची दुरवस्था, अरूंद रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी, वेळेच अपव्यय, इंधनाचा वाढलेला भार अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

"थेट उड्डाणपुलावरील गर्डरचे काम होत असल्याचा आनंद आहे. मात्र, संपूर्ण पुलाचे काम होऊन तो वाहतुकीसाठी लवकर खुला होण्याची वाट आम्ही प्रवासी पाहत आहोत. गेली चार वर्षात वाहतुकीचा मोठा त्रास सहन केलेला आहे. तो लवकर कमी व्हावा, ही अपेक्षा आहे.'

जगदीश उंद्रे, दैनंदिन प्रवासी

"रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या कामापैकी भुयारी मार्ग पादचारी व दुचाकींसाठी सुरू झालेला आहे. महिनाभरात रूळावरील सुरू असलेले मुख्य छताचे, त्यावरील काँक्रीटीकरण व इतर काम पूर्ण होईल.'

मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Pune Accident: मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

SCROLL FOR NEXT