Pune 
पुणे

Pune: पावसामुळे अन् निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे, हेच कळेना

श्रीकुंज सोसायटी ते व्हीआयआयटी कॉलेज रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली

अशोक गव्हाणे

कोंढवा - कोंढवा परिसरातील पावसामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून कै. सदाशिव बापू दरेकर शाळा, श्रीकुंज सोसायटी ते व्हीआयआयटी कॉलेज रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे.

मात्र, प्रशासनाकडून यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे हेसुद्धा कळत नाही. या रस्त्यासंबंधी तत्काळ निर्यण घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सदर परिसर हा नाल्याचा असून या रस्त्यावरून पाऊस पडल्यानंर पाणी वाहत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रस्ता तत्काळ उखडला जातो आणि दुरवस्था होते.

रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वावर असतो त्यामुळे या रस्त्याच्या संदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.दुरावस्थेबाबबत अनेकवेळा तक्रारी करूनही सुधारणा होत नाही. अनेक ठिकाणी खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. ते पाणी दुचाकीचालक, पादचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून येते अशा तक्रारी नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया -

रस्त्याची अवस्था वाईट असून गाडी तर सोडा साधे चालताही येत नाही. त्याची दुरुस्ती नाही केली तर, माशांना काय माणसांना पोहण्यासारखे खड्डे होतील काय अशी शंका येते. कै. सदाशिव बापूसाहेब दरेकर शाळा, व्हीआयआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वावर या रस्त्यावरुन असतो. त्यामुळे किमान खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने तत्काळ हाती घ्यावे.

- समीर शिंदे, स्थानिक नागरिक

उंच सखल भाग असल्या कारणाने या रस्त्यावरुन पाणी वाहण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे खड्डे होतात. पावसामुळे खड्डे बुजविताना अडचणी येत आहेत. मात्र, या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

- सिद्राम पाटील, शाखा अभियंता, पथ विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: 28 लाखांची बॅग घेऊन कर्मचारी पसार; पुणे पोलिसांचा 10 हजार किमी पाठलाग, अखेर चौघे जाळ्यात

U19 Asia Cup Final, IND vs PAK: भारताला वचपा काढण्याची संधी, पण पाकिस्तानने ठेवलंय भलंमोठं लक्ष्य, उस्मान खानचं शतक

अशोक सराफ यांचा दात पडण्याचा किस्सा ऐकून माधुरीलाही हसू अनावर; नेमकं काय घडलं होतं? Video

Latest Marathi News Live Update: 'हा दुष्काळ निसर्गनिर्मित नाही, राज्यकर्त्यांनी निर्माण केला'; लक्ष्मण हाकेंचा सरकारवर संताप

भरधाव कार पुलाला धडकून भीषण अपघात, कारचा चुराडा; तीन मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT